हन्नुर : नागराज गाढवे
बोरेगाव (ता. अक्कलकोट) येथील ग्रामपंचायतीच्या वतीने जनावरांना लाळखुरकत व विविध रोगांवर उपचार आणि लसीकरण करण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन सरपंच उमाकांत गाढवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पशुधन अधिकारी डॉ. सचिन मोरे, पशुधन पर्यवेक्षक संतोष कसबे, मनोज वडगावे, शांताराम चव्हाण, गौरीशंकर खांडेकर, बसवणाप्पा पावले, भीम खांडेकर, कलाप्पा औरसंगे, मनोहर बनसोडे यांच्यासह गावातील पशुपालक मोठ्या संख्येने शिबिरात उपस्थित होते.
तसेच या शिबिरामध्ये एकूण 347 जनावरांवर उपचार करण्यात आले. त्यापैकी लाळखुरकत या रोगांवर १७८ जनावराना लसीकरण करण्यात आले. वंध्यत्व उपचार म्हणून २३ आणि जनऔषध ८७ जनावरे तसेच गोळी उपचार म्हणून ३२ जनावरे व इतर आजार म्हणून २७ जनावरे यावर उपचार करण्यात आले.
पशुपालकांनी वेळोवेळी पशूंची काळजी घ्यावी. जून आणि नोव्हेंबर महिन्यात जनावरांना लसीकरण करण्यात येते. पशुपालकांनी दर सहा महिन्यांनी न चुकता जनावरांना हे लसीकरण करावे. यामुळे लाळ खुरकत आणि लहान मोठ्या होणाऱ्या रोगापासून वाचवता येतो. तसेच वेळोवेळी पशूंना जंतनाशक औषध द्यावे आणि विविध आजारांवर लवकर पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करून योग्य ते काळजी घ्यावी.
- पशुधन डॉ. सचिन मोरे
सद्या तालुक्यात लाळ खुरकत ची साथ जनावरांवर आली आहे. या आजारामुळे अनेक जनावर दगावली आहे. जनावरांना ताप आणि तोंडाला फेस येणे तसेच चारा न खाणे अशी लक्षणे दिसतात. या रोगामुळे जनावरं दगावण्याची शक्यता जास्त असते. याचीच वेळीच उपचार म्हणून ग्रामपंचायतीच्या वत्तीने ही उपचार आणि लसीकरण शिबिराचे मोहीम राबविली आहे.
- उमाकांत गाढवे, सरपंच बोरेगाव