तुळजापूर : कुमार नाईकवाडी
कोरोनाच्या आपत्ती काळात हतावरचे पोट असणारा नाभिक समाज बांधव आज अर्थिक समस्यांचा सामना करतो आहे,पण तात्काळ सरकार दरबारी नाभिक बांधवांचे प्रश्न मांडून त्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती महाराष्ट्र नाभिक महामंडळ प्रदेश अध्यक्ष कल्याणराव दळे यांनी दिली आहे.
नाभिक समाज बांधवांचे उस्मानाबाद जिल्हा संघटनेच्या नूतन पदाधिकारी निवड यासाठी जिल्हा बैठक घेण्यात आली. यावेळी प्रदेश अध्यक्ष कल्याणराव दळे बोलत होते.यावेळी जिल्हाध्यक्ष लक्ष्मण माने,डी एन कोळी,ओबीसी अधिकारी कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष सुखदेव भालेकर,धनंजय राऊत,दाजी आप्पा पवार,व्यंकट पवार,प्रेमचंद गोरे,उद्धव क्षीरसागर,दादासाहेब राऊत,सतीश कसबे,रवी कोरे यांच्यासह जिल्हातील तालुका अध्यक्ष आदींची उपस्थिती होती.
उस्मानाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्वच जिल्ह्यातील नाभिक बांधव सध्या कोरोनाच्या आपत्तीमुळे हतबल झालेले आहेत, ग्राहक कमी झाले असून सलून दुकान भाडे व नाहक वाढीव वीजबिल अन कुटूंब व्यवस्था सांभाळताना अनेक आर्थिक समस्याचा सामना करावा लागत आहे,त्यामुळे आगामी काळात तात्काळ सरकार दरबारी आर्थिक मदतीची मागणी केली असून यावर नक्कीच उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे विधान प्रदेश अध्यक्ष कल्याण दळे यांनी यावेळी केले.
नाभिक बांधवांचे संघटन व सक्षमीकरणासाठी सातत्याने राज्यभर दौरे सुरू आहेत,त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकारला भाग पाडू तसेच तात्काळ मदत उपलब्ध करून दिलासा देण्याचा प्रयत्न असल्याने मत कल्याण दळे यांनी व्यक्त केले.
