तुळजापुर : कुमार नाईकवाडी

शहरातील गंभीर आजार उद्भवल्यास तात्काळ वैद्यकीय सेवा उपलब्ध करण्यात याव्यात, अशा प्रकारचे एक लेखी निवेदन बुधवार दि. ७ रोजी भाजपा युवा मोर्चाचे तथा श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाचे उपाध्यक्ष विपीन शिंदे यांच्यावतीने तुळजापुर तहसीलदार यांना देण्यात आले आहे. 

शिंदे यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, कोविड-19 या संसर्गजन्य महामारी रोगाच्या काळात अनेक स्थानिक नागरीकांना वैद्यकीय उपचारासाठी ॲडमिट करण्यासाठी तुळजापुर शहरात सुविधा नसल्यामुळे अनेक सर्वसामान्य नागरीकांना अनेक समस्याला तोंड द्यावे लागत आहे. छोट्या-मोठ्या उपचारासाठी इतर जिल्ह्यामध्ये उपचारासाठी जाण्याची वेळ येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरीकांना मानसिक ञास सहन करावा लागत आहे.तुळजापुर शहरामध्ये अत्याधुनिक रुग्णालय आहेत. परंतु ते रुग्णांना उपचार करण्यास व अँडमिट करण्यास टाळा टाळ करीत आहेत. येथील जिल्हा उपजिल्हा रुग्णालय तुळजापुर या ठिकाणी उपचारासाठी गेल्यास कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाच्या शेजारी त्यांचे उपचार केले जात आहेत व तेच रुग्ण पॉजिटीव्ह होत आहेत. अशा अनेक समस्याना तोंड द्यावे लागत आहेत. तरी इतर आजारी रुग्णाना अँडमिट करण्यासाठी खाजगी हाँस्पीटलची नियुक्ती करुन नागरीकांची सोय व्हावी, असे निवेदनात म्हटले आहे.

या निवेदनावर विपीन शिंदे यांची स्वाक्षरी आहे. या निवेदनाची प्रत माहितीस्तव राज्याचे आरोग्य मंञी राजेश टोपे, डाँ. डी.के.पाटील सिव्हील सर्जन उस्मानाबाद यांना देण्यात आल्या आहेत.

 
Top