उस्मानाबाद, दि. 20 : ०५-औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूकी करिता मतदान दि. ०१ डिसेंबर २०२० रोजी होणार असून सदर मतदानासाठी पदवीधर असलेले व ज्यांनी नाव नोंदणी केलेली आहे अशा मतदारांना त्यांचे मतदान केंद्र, व मतदार यादी मधील नाव याबाबतची माहिती मिळणे साठी मतदार मदत कक्ष जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यान्वित करण्यात आलेला आहे. 

सदर कक्षाचा दूरध्वनी क्रमांक  ०२४७२-२२७३०५  हा आहे. सदर दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करून मतदारांनी त्यांचे मतदान केंद्र, व मतदार यादी मधील नाव याबाबतची माहिती प्राप्त करून घ्यावी असे आवाहन मा. सहायक निवडूणक निर्णय अधिकारी ०५- औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ तथा जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांनी केले आहे.

 
Top