ढोकी, दि. 8 : तेर, ता. उस्मानाबाद येथील 1) गुणवंत टेळे 2) रावसाहेब टेळे 3) श्रीमंत टेळे यांच्या गटाचा नातेवाईकांतीलच- 1) नेताजी टेळे 2) बालाजी टेळे यांच्या गटाशी शेतातील सामाईक बांधावरील गवत जाळण्याच्या कारणावरुन दि. 07.11.2020 रोजी 09.00 वा. सु. तेर शिवारातील शेतात वाद झाला. यात दोन्ही गटांतील सदस्यांनी परस्परविरोधी गटांतील सदस्यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, विळा, दगडाने मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या दोन्ही गटांतील सदस्यांनी दि. 07.11.2020 रोजी दिलेल्या स्वतंत्र 2 प्रथम खबरेवरुन 2 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
नळदुर्ग, दि. 8 : भारत रानबा जाधवर, रा. हगलुर, ता. तुळजापूर हे त्यांच्या पत्नीसह दि. 07.11.2020 रोजी 16.00 वा. सु. मानेवाडी येथील शेतात होते. यावेळी पुर्वीच्या भांडणाच्या करणावरुन सुरेखा कराड, उज्वला कराड, दोघी रा. हगलुर व मलकु बरवे, रा. मानेवाडी या तीघांनी भारत जाधवर यांसह त्यांच्या पत्नीस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने, विळ्याने मारहाण करुन जखमी केले. तसेच ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या भारत जाधवर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उस्मानाबाद, दि. 8 : सुरेश माणिकराव जाधव, रा. तांबरी विभाग, उस्मानाबाद यांना पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन दि. 05.11.2020 रोजी 21.00 वा. सु. उस्मानाबाद शहरातील मारवाड गल्ली येथे बालाजी धनंजय रायबान, रा. रायबान गल्ली, उस्मानाबद यांनी शिवीगाळ करुन फायटरने मारहाण करुन सुरेश जाधव यांना जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या सुरेश जाधव यांनी दि. 07.11.2020 रोजी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 324, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उस्मानाबाद, दि. 8 : पुनम डावरे, रा. कुरणेनगर, उस्मानाबाद यांच्या घरात- जागेत पती- कनिष्क डावरे यांनी जाउ नये असा न्यायालयाचा मनाई आदेश असतांनाही पती- कनिष्क यांनी दि. 07.11.2020 रोजी 21.00 वा. सु. पत्नी- पुनम डावरे यांच्या घरात जाण्याचा प्रयत्न केला. यावर पत्नी- पुनम यांनी त्यांचा विरोध केल्याने चिडुन कनिष्क यांनी शिवीगाळ करुन घराच्या खिडकीच्या व अंगणातील कार क्र. एम.एच. 14 डीए 8570 च्या मागील खिडकीच्या काचा फोडुन आर्थिक नुकसान केले. अशा मजकुराच्या पुनम डावरे यांनी आज दि. 08.11.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188, 427, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.