तामलवाडी, दि. 09 : शकुंतला कुशाल क्षिरसागर, रा. पांगरधरवाडी, ता. तुळजापूर व त्यांचे नातेवाई- राजेश रावन क्षिरसागर, प्रकाश क्षिरसागर यांच्यात शेतजमीन वाटणी संदर्भात दि. 07.11.2020 रोजी 19.00 वा. सु. शकुंतला यांच्या मोठ्या दिराच्या घरी बैठक भरली होती. बैठकीत पुर्वी विकलेले शेतजमीनीचा मोबदला शकुंतला यांनी राजेश क्षिरसागर यांना मागीतला असता राजेश व प्रकाश क्षिरसागर यांसह अन्य 9 व्यक्तींनी चिडून जाउन शकुंतला क्षिरसागर यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन मुका मार दिला व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या शकुंतला क्षिरसागर यांनी दि. 08.11.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 149, 147, 323, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


उस्मानाबाद, दि. 09 : “तुझे पैसे देतो.” असे अविनाश बालाजी गिरी, रा. साठेनगर, उस्मानाबाद यांना शिवा कांबळे, रा. आनंदनगर, उस्मानाबाद यांनी दि. 06.11.2020 रोजी 23.15 वा. सु. मोबाई फोनद्वारे सांगुन केके हॉस्पीटल, उस्मानाबाद येथे बोलावून घेउन शिवा कांबळे यांसह गंगाबाई कांबळे, सोनु कांबळे, दादा यांनी, “तु आमच्या विरुध्द तक्रार का दिली आता तर तुला पैसेच देणार नाही. जर तु पैसे मागीतले तर तुला जिवे मारु.” असे अविनाश गिरी यांना धमकावून शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी पाण्याने, दगडाने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या अविनाश गिरी यांनी दि. 08.11.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


वाशी, दि. 09 : काझी सयद परवेज सयद मुमताज काझी, रा. काझी गल्ली, वाशी हे दि. 08.11.2020 रोजी 13.30 वा. सु. वाशी सर्वे क्र. 735 ब मधील शेतात काम करत होते. यावेळी गावातीलच- अतिश सहदेव क्षिरसागर हे शेताशेजारी शेळ्या चारत असतांना शेळ्या काझी यांच्या कांदा पिकात आल्याने काझी यांनी अतिश क्षिरसागर यांना कांदा पिकात शेळ्या चारु नका कांद्याचे नुकसान होत असल्याचे सांगीतले. यावर चिडून जाउन अतिश क्षिरसागर यांनी मोबाईल फोनद्वारे भाऊबंद- नितीन क्षिरसागर, अभिषेक क्षिरसागर, अमोल क्षिरसागर, अजय बाबर, बाळु क्षिरसागर यांना बोलावून घेउन काझी यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गजाने मारहाण करुन जखमी केले. तसेच ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या काझी यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 324, 323, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


मुरुम, दि. 9 : शेतात कामाला न आल्याच्या कारणावरुन प्रदिप व विकास पांडुरंग पुजारी या दोघा भावांसह किरणकांत पुजारी, शिवाजी माकणीकर, चौघे रा. अचलेर, ता. लोहारा यांनी दि. 08.11.2020 रोजी अचलेर तांडा येथे जाउन भिम चव्हाण यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी त्यांचा बचाव करण्यास त्यांची आई- गंगा व पत्नी- महंता पुढे आल्या असता त्‍यांनाही नमूद चौघांनी शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. अशा मजकुराच्या भिम चव्हाण यांनी आज दि. 09.11.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन गुन्हा नोंदवला आहे.


 
Top