नळदुर्ग, दि. 03 : येथील पत्रकार तथा बौध्दाचार्य दादासाहेब बनसोडे यानी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ द्वारा वृत्तपत्र विद्या जन संज्ञापन पदविका आभ्यासक्रम २०१९-२० मध्ये दि. २१, २२, २३, २४ ऑक्टोबर २०२० मध्ये घेण्यात आलेल्या ऑनलाईन परिक्षेत 87.50 % गुण मिळवुन वयाच्या ५० व्या वर्षी घवघवीत यश प्राप्त केले आहेत. या यशाला कॉलेजचे प्राचार्य विलास लेंगरे, प्रा. म्हमाणे, प्रा. पुजारी, प्रा. मठ तसेच शुभम लोंढे, राऊत, विनोद दुपारगुडे, लोखंडे यांचे मार्गदर्शन लाभले .

या यशाबद्दल राजकुमार रोचकरी, रविचंद्र गायकवाड, नगरसेवक दयानंद बनसोडे, अँकर किरण चौधरी सह नळदुर्ग व परिसरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .

 
Top