उस्मानाबाद, दि. 24 : मी केंद्रात मोदीजी बरोबर काम करीत आहे. त्यामुळे मी दिल्लीत खूश आहे. महाराष्ट्रात भाजपाचे सरकार आल्यास आपण मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक नाही, असे मत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
पदविधर मतदार संघातील भाजपाचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ मंत्री दानवे मंगळवार दि. २४ नोंव्हेबर रोजी उस्मानाबादला आले होते. त्यांनी एक कार्यकर्त्यांचा मेळावा ही घेतला. सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत दानवे यांनी राज्यसरकारचा एक वर्षांचा कारभार व फडणवीस यांचा ५ वर्षांचा कारभारांची तुलना लोक करीत असून लोकांत संताप आहे. मराठवाडयासाठी जाहीर केलेली वॉटर ग्रेड योजना, कोप्रा योजना, जलयुक्त शिवार योजना आदी योजना बंद केल्या आहेत. मराठवाडयाच्या विकासासाठी सरकार ने निधीही दिलेला नाही. ठाकरे सरकार अपयशी ठरले आहे. तीन पक्षाचे सरकार असल्यामुळे योग्य समन्वय नसल्यानेच मराठा आरक्षणला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळाली. तामिळनाडूमध्ये याच प्रकरणी सुप्रिम कोर्टामध्ये राज्यसरकार ने योग्य बाजू मांडल्याने प्रश्न निकाली निघाला. परंतू मराष्ट्रातील मराठा आरक्षणाला स्थगिती दिली.
यावेळी पत्रकारांनी शिवसेनेच्या सरनाईक यांच्यावर केलेली कारवाई योग्य आहे का ? या संदर्भात विचारले असता मंत्री दानवे यांनी आपले हात बरबटले नसतील तर ईडी का घाबरता ? ईडीच्या कारवाया आमच्याव रपण झाल्या आहेत. कशाला सिडीचा उल्लेख करता, असे म्हणून त्यांनी एकनाथ खडसेंना ही टोला मारला. एका प्रश्नाला उत्तर देताना बाळासाहेब ठाकरे हे सर्वमान्य देते होते. त्यामुळे त्यांच्याविषयी कांही बोलणार नाही, असे सांगून अर्जून खोतकर माझे चांगले मित्र आहेत, असे सांगितले.
यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील, संभाजी पाटील निलेंगकर, अॅड. मिलींद पाटील, जिल्हाध्यक्ष नितीन काळे, अॅड. व्यंकटराव गुंड, गोविंद केंद्र, अॅड. अनिल काळे, सुधीर पाटील, अॅड. खंडेराव चौरे आदी उपस्थित होते.