तुळजापूर : कुमार नाईकवाडी

महाराष्ट्राची कुलस्वामिनी कोट्यावधी जनाचे आराध्य दैवत असलेल्या श्री तुळजाभवानी मातेच्या कोजागीरी पोर्णिमा पाठच्या मंगळवारी श्री तुळजाभवानी मातेच्या दरबारात श्री देवीचे बाहेरुन कळस दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.

संसर्गजन्य कोरोनामुळे गेल्या नऊ माहिन्यापासुन श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनास भाविकांना प्रवेश बंदी करण्यात आली आणि शारदीय नवराञ महोत्सव ते आश्विन पोर्णिमा पर्यत तिर्थ क्षेञ तुळजापुरात पोलीस पोलीस प्रशासन, महसुल प्रशासन व न.प.प्रशासन यांनी श्री भक्तांना दर्शनास येवू नये, अशी कडक अंमलबजावणी करण्यात आली होती. मात्र ही अंमलबजावणी उठताच मंगळवार दि. ३ नोव्हेंबर रोजी श्री तुळजाभवानी मातेचा दरबार भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. 

तत्पूर्वी श्री देवीचे पहाटे चरण तिर्थ होवून दरवाजे उघडण्यात आले. त्यानंतर सकाळी सहा वाजता श्री देवीजीस पंचामृत अभिषेक घालुन वस्ञोअलंकार घालण्यात आले. मंगळवारी शहरातील भवानी रोड, शुक्रवार पेठ, मंगळवार पेठ, दिपक चौक येथील रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. बाजार पेठामध्ये भाविकांची प्रासादिक साहित्य घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. सायंकाळी श्री तुळजाभवानी मातेच्या मंदीर परिसरात छबीना काढण्यात आला.


 
Top