जळकोट : मेघराज किलजे
नळदुर्ग शहर मनसेच्या वतीने दिवापली निमित्त शहरातील गरीब व गरजू कुटूंबियांना जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांच्या हस्ते किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.
हातावरचे पोट असणा-यांना व मोलमजुरी करून आपल्या कुटूंबाचा चरितार्थ चालविणे मुश्किल झाले असताना दिवाळी निमित्त घरी गोडधोड करणे खूपच कठीण असते. या बाबीचा विचार करून दिवाळी भेट म्हणून साखर, तेल, तूर दाळ, हरभरा दाळ, चकली-चिवडा मसाला, जामुन पाकीट, मैदा, बेसन, रवा, अगरबत्ती, तांदुळ, उटणे, सुगंधी तेल, शेंगदाणे आदीचे किराणा मालाचे किट नळदुर्ग शहर मनसेच्या वतीने वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे, शहराध्यक्ष अलिम शेख, शहरसचिव प्रमोद कुलकर्णी यांच्या सह संदीप वैद्य, अमर भाळे, कलीम शेख, मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.