नळदुर्ग, दि. 24 : खुदावाडी ता. तुळजापूर येथील गरीब कष्टकरी कुटुंबातील कु. आकाश मदन घोडके याची भारतीय लष्कर दलात निवड झाली आहे. त्याबद्दल खुदावाडी ग्रामस्थ व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने कु. आकाश घोडके यांचा सत्कार करण्यात आला.
खुदावाडी गावातील युवक कु. आकाश मदन घोडके हा भारतीय सैन्य दलात भरती झाल्याबद्दल ग्रामस्थांच्यावतीने त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी गावचे सरपंच शरद गणपतराव नरवडे, तालुका अध्यक्ष केदारनाथ पाटील, चेअरमन तुकाराम बोंगरगे, ग्रा प सदस्य पंडित कबाडे, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष संगमेश्वर चिंचोले, प्रा. संतोष सांगवे, तुळशीराम घोडके, निसर्ग सालेगावे यांच्यासह मित्रपरिवार व ग्रामस्थ उपस्थित होते.