उस्मानाबाद, दि. 11 : केळगाव (ता.सिल्लोड जि.औरंगाबाद) येथील महिला पोलिस पाटील यांच्यावर अत्याचार करून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य गांव कामगार पोलिस पाटील संघाच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केळगाव (ता.सिल्लोड जि. औरंगाबाद येथील महिला पोलिस पाटील यांच्यावर गावातील काही लोकांनी अत्याचार,अश्लिल शिवीगाळ करुन आत्महत्येस प्रवृत्त केले आहे. त्यांनी विष प्राषण करुन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला असून सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. संबंधित पोलिस ठाण्याच्या पोलिस अधिका-यांनी आजपर्यंत पोलिस पाटील यांच्या तक्रारीची दखल न घेतल्याने हा प्रकार घडला आहे. सदरील प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून आरोपीना कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे. माहितीस्तव सदर निवेदनाच्या प्रती गृहमंत्री महाराष्ट्र राज्य, विशेष पोलिस महानिरिक्षक, औरंगाबाद, पोलिस अधिक्षक, औरंगाबाद ग्रामीण यांना देण्यात आल्या आहेत.

निवेदनावर जिल्हाध्यक्ष हणुमंत देवकते-पाटील, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख सुभाष कदम-पाटील, जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय जनक  कोल्हे यांच्या साक्षऱ्या आहेत. 

 
Top