चिवरी, दि. 23 : आजच्या युगात वाढदिवसावर लाखो रुपये खर्च करतात, श्रीमंत असो वा गरीब मात्र बडेजाव  करून वाढदिवसानिमित्त पै पाहुणे, मित्रमंडळी यांना बोलावून हॉल, मंडप ,डेकोरेशन यावर तरुण वर्ग लहान मुलाचे पालक, वाढदिवस साजरा करताना दिसतात त्याचबरोबर अनावश्यक गोष्टीवर हजार रुपये खर्च करून पैशाची उधळपट्टी करताना पाहावयास मिळते. पण या परंपरेला छेद देऊन सामाजिक बांधिलकी जोपासत तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील उपसरपंच बालाजी ज्ञानदेव  पाटील यांनी आपल्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त गावातील तरुणांना  मोफत प्रशिक्षण देत असलेली महालक्ष्मी कॅरीयर ॲकेडमीचे  संस्थापकश्री विठ्ठल मारुती होगाडे यांच्याकडे पाच हजार रुपयांचा धनादेश सुपूर्त करून या विधायक पद्धतीने आपल्या मुलीचा वाढदिवस साजरा केला. त्यांचा हा प्रेरणादायी उपक्रम इतर पालकांसाठी, आदर्शवत देणारा आहे. या सामाजिक उपक्रमाबद्दल पाटील परिवाराचे परिसरातून कौतुक होत आहे.

 
Top