उस्मानाबाद, दि. 14 : डिगंबर गजाप्पा बंडगर, रा. इटकळ, ता. तुळजापूर यांच्या इटकळ शिवारातील विहीरीतून एमटेक कंपनीचा 5 अश्वशक्ती क्षमतेचा पाणबुडी विद्युत पंप दि. 10 व 11.12.2020 रोजीच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरला होता. यावरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत नळदुर्ग पो.ठा. येथे गु.र.क्र. 362 / 2020 दाखल आहे.
गुन्हा तपासात स्था.गु.शा. च्या पथकाने दि. 14.09.2020 रोजी आरोपी- मारुती महादेव वाघमारे, वय 21 वर्षे, रा. काटगाव, ता. तुळजापूर यास ताब्यात घेउन त्याच्या ताब्यातून नमूद पानबुडी विद्युत पंप जप्त करुन त्यास नळदुर्ग पो.ठा. यांच्या ताब्यात दिले असुन गुन्ह्यातील अन्य साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत. ही कारवाई स्था.गु.शा. चे पोनि- श्री गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखालील पोउपनि- श्री भुजबळ, पोहेकॉ- काझी, पोना- शेळके, संतोष गव्हाणे, पोकॉ- बलदेव ठाकुर यांच्या पथकाने केली आहे.