किलज : राम जळकोटे

तुळजापूर तालुक्यातील किलज येथील विठ्ठल रकुमाईच्या मंदिरात सालाबादप्रमाणे आयोजित करण्यात येणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहाला आज मंगळवार दि. १ नोव्हेंबर पासून सुरुवात करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली आठ महिने  सर्व धार्मिक स्थळ बंद होती व आता आठ महिन्यानंतर  महाराष्ट्र शासनाने मंदिरे उघडण्यास दिलेल्या परवानगीनंतर गावच्या कमिटी ने हा निर्णय घेतला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करीत हा सप्ताह चालू राहणार आहे. गेली ३६  वर्ष पासून सुरू असलेला हा वारकरी सांप्रदायिक सोहळा गावातील तरुण वर्ग तसेच वारकरी वर्गांनी सुरू हा वारसा सुरु ठेवला आहे.

किलज येथे दरवर्षी अतिशय मंगलमय वातावरणात साजरा होणारा अखंड हरीनाम सप्ताह पार पडणार आहे.किलज या गावची सुमारे ४५०० हजार लोकसंख्या असलेल्या गावाची व परिसरातील शेती प्रधान आणि वारकरी संप्रदायाचे गाव म्हणून ओळख आहे.

"कोरोना" चा वाढता संसर्ग लक्षात घेवून प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचना व नियमांचे पालन करीत आणि योग्य ती खबरदारी घेत हा सप्ताह  साजरा करण्यात येणार असल्याचे वारकरी संप्रदाय कमिटी च्या वतीने हा सप्ताह असाच ७ दिवस चालू राहणार आहे.

या सात दिवसात विविध धार्मिक कार्यक्रम होणार असल्याचे कमिटीचे हभप मोहन पाटील यांनी सांगितले आहे. तर या संपूर्ण सप्ताहाची रूपरेषा गावातील माजी पोलीस उपनिरीक्षक शिवराज मरडे यांनी पहिल्या दिवशी दिली आहे.

 
Top