नळदुर्ग, दि. 11 : मुजाहीद रशीद शेख, रा. नळदुर्ग, ता. तुळजापूर यांनी दि. 09.12.2020 रोजी  नळदुर्ग येथील त्यांच्या ‘सरकार ॲक्वा व ढाबा’ समोर ॲपे मॅजीक क्र. एम.एच. 25 एजे 1910 हा लावला होता. रात्री 12.00 वा. सु. गावकरी- मन्सुर मकसुद शेख व मौजुद शेख यांच्या चिथावणीवरुन चंद्रकांत गायकवाड, रा. चिकुंद्रा यांसह सोबतच्या एका अनोळखी परुषाने त्या ॲपे मॅजीक वाहनावर पेट्रोल टाकून जाळला. यात मुजाहीद शेख यांचे अंदाजे दिड लाखाचे नुकसान झाले. अशा मजकुराच्या मुजाहीद शेख यांनी दि. 10.12.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 435, 109, 427, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 
Top