तुळजापूर, दि. १८ : झी मराठीवर गाजत असलेल्या "तुझ्यात जीव रंगला" या मालिकेतील कलाकाराच्या चमूने आज शुक्रवार दि. 18 रोजी श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर या कलावंताचा तुळजापुरात तरुण मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
तुझ्यात जीव रंगला या मराठी मालिकेतील 13 कलावंतांनी एकत्रित तुळजाभवानीचे दर्शन घेतले. यामध्ये अंजली बाई आणि राणा दादा यांची लोकप्रिय भूमिका करणाऱ्या कलाकारांचा समावेश होता. कलावंत आणि तंत्रज्ञ यांनी तुळजाभवानीचे दर्शन घेतल्यानंतर सर्वांचा मंदिर कार्यालयात गणेश अणदूरकर हस्ते सत्कार करण्यात आला.