तुळजापूर : सतीश महामुनी

तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात भीक मागणाऱ्या शेकडा मुला-मुलींच्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या त्रासांमध्ये प्रशासनाच्या प्रयत्नाने एका मुलीला नियमित शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात यश मिळाले आहे.

राष्ट्रीय अपराध ज्यांचब्युरो तुळजापूर, चाईल्ड लाईन उस्मानाबाद, तुळजापूर पोलीस विभाग, तुळजापूर नगर पालिका यांनी संयुक्तपणे कारवाई केली आहे जिल्हा समन्वयक ज्ञानेश्वर गिरी, पोलीस कर्मचारी दांडे, राष्ट्रीय अपराध जांच राज्य समन्वयक संजय कुमार बोदर आणि बालकल्याण समितीचे अध्यक्ष आश्रुबा कदम यांनी अत्यंत संवेदनशीलतेने आणि नियोजनबद्ध पद्धतीने तुळजाभवानी मंदिरासमोर दोन दिवसापूर्वी सदर 14 वर्षाच्या मुलीला बेवारसपणे फिरत असताना ताब्यात घेतले आणि त्याची चौकशी करून तिच्या कुटुंबीयांची माहिती विचारल्यानंतर बालकल्याण समितीचे अध्यक्ष अश्रुबा कदम यांनी सदर मुलीला नळदुर्ग येथील आपलं घर या प्रशालेमध्ये ठेवण्याचे आदेश दिले. त्यानुसार सदर मुलगी शिक्षणाच्या प्रवाहात आलेली असून ती प्रशालेत दाखल झाली आहे गेल्या अनेक महिन्यापासून सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये हा सकारात्मक प्रयत्न मानला जात आहे.

श्री तुळजाभवानीची तीर्थक्षेत्रातील तुळजाभवानीच्या मंदिरासमोर अनेक वर्षापासून मोठ्या प्रमाणात भीक मागणाऱ्या मुला आणि मुलींचा मोठा त्रास भाविकांना सहन करावा लागत आहे या भीक मागणाऱ्या मुला मुली मुळे तीर्थक्षेत्राची प्रतिमा डागाळली गेली आहे. नवदांपत्य आणि शहरी भागातील भाविक भक्त या प्रकाराने घाबरून जातात अशा प्रकारची गंभीर स्थिती मंदिरासमोर सातत्याने निर्माण झालेली आहे. मात्र या त्रासाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केलेले आहे. अलीकडच्या काळात राष्ट्रीय अपराध ज्यांच ब्युरो या संस्थेने सातत्याने विविध शासकीय कार्यालयामध्ये प्रयत्न करून या प्रश्नासंदर्भात शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना सकारात्मक करण्यात यश मिळवले आहेत त्यामुळे ही कारवाई होऊ शकली आहे.

भीक मागणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत त्यासाठी वेगवेगळ्या खात्याचे अधिकारी काम करतात या सर्वांना सोबत घेऊन काम करणे त्यामुळे हे विद्यार्थी शाळेच्या प्रवाहात येऊन इतर मुलांप्रमाणे आपलं करियर करू शकतात.

- संजयकुमार बोदर, तुळजापूर


 
Top