नळदुर्ग , दि.२१: एस.बी.आय शाखा नळदुर्ग येथे एस.बी.आय फाऊंडेशन मुंबई व दिलासा जनविकास प्रतिष्ठान, औरंगाबाद, वित्तीय समावेशन जिल्हा विकृय केंद्र उस्मानाबाद यांच्या समन्वयाने गुरुवारी आर्थिक साक्षरता शिबीर घेण्यात आले.
यावेळी मिलिंद जरिपटके मुख्य प्रबंधक (FIDSH),निलेश विजयकर (LDM) उस्मानाबाद, मोहित आडके डेप्युटी मॅनेजर (FIDSM), निर्माण पारकर शाखा व्यवस्थापक नळदुर्ग यांनी खाते उघडणे, जिवनज्योती योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना, कर्ज परतफेड अदि अशा विविध विषयावर मार्गदर्शन केले.
यावेळी एस.बी.आय शाखा नळदुर्गचे सुखविंदर सिंग, राजू राजगिरी, संभाजी कदम, निळू राठोड. दिलासाचे विलास राठोड, गुरूदेव राठोड , भुषण पवार, अजित राठोड, हरिश राठोड, पद्माकर घोडके, पत्रकार विलास येडगे, सुधीर हजारे, श्रीमंत राठोड, वसंत जाधव, गणेश राठोड, अमोल पवार तसेच रामतिर्थ, रामनगर, येडोळा, गायरान तांडा, जकणी तांडा, आलियाबाद, वागदरी, खुदावडी परिसरातील शेतकरी, उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार विलास राठोड यांनी मानले.