उस्मानाबाद, दि. 08 : भारतातील सर्व राष्ट्रीय महामार्ग वरील टोल वर फास्ट टॅग अनिवार्य करण्यात आलेला आहे.दि.01 जानेवारी-2021 नंतर रोख रक्कममध्ये कोणतेही पेमेंट स्वीकारले जाणार नाही. फास्ट टॅग काढण्यासाठी केवळ दहा मिनिंट लागतात, तेव्हा जिल्हयातील वाहनधारकांनी फास्ट टॅग करुन घ्यावे,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

फास्ट टॅग काढण्यासाठी उस्मानाबाद शहरात ॲक्सीस बँक, आयसीआयसीआय बँक,आयडीएफसी बँक, एसबीआय बँक, एचडीएफसी बँक,पेटियम,कोटक महिंद्रा बँक,सिंडिकेट बँक,इन्डसिंड बँक,युनियन बँक आदी ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे.फास्ट टॅग केल्यास आपल्या मूल्यवान वेळेबरोबरच इंधनाची बचत करता येईल. फास्ट टॅग चा उद्देश हा प्रवाशांसाठी सुलभ आणि तात्काळ बाहेर पडण्याची  ही प्रणाली आहे.            

सुलभ देय,लांब रांगेतून सुटकारा,काही सेकंदातच आरएफआयडी द्वारे फास्ट टॅग ने ऑटोमॅटीक टोल फ्री घेऊन वाहनास विना विलंब पुढे जाता येईल.कॅश च्या स्वरुपातील देयापासून मुक्ती (सोबत कॅश बाळगण्याची गरज नाही) मिळते. डिजीटल इंडिया चे स्वप्न साकार करण्यास मदत होईल.त्यामुळे माय फास्ट टॅग ॲप (गुगल प्ले स्टोअर) वर फास्ट टॅग करता येते.फास्ट टॅग करण्यासाठी पारगाव जि.उस्मानाबाद, पाडळसिंगी जि.बीड,भोकरवाडी-माळेवाडी जि.जालना येथे फास्ट टॅगची तसेच टॉपअप रिचार्ज या सोयी उपलब्ध आहेत.

 
Top