नळदुर्ग : एस.के.गायकवाड
तेरणा पब्लिक चॅरीटेबल ट्रस्ट उस्मानाबाद संचलित तेरणा जनसेवा क्लिनिकच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व उपचार करण्यात येणार असून नळदुर्ग ता. तुळजापूर येथे याविषयीची माहिती देण्यातसाठी मोफत सल्ला व मार्गदर्शन केंद्राची सुरुवात दि. १ जानेवारी २०२१ रोजी करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पुढाकाराने उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेला आरोग्य सेवा सहज व मोफत उपलब्ध व्हावी, त्याना ह्रदय शस्त्रक्रिया, मनक्यावरील शस्त्रक्रिया, किडनीचे आजार, कँसरवरील शस्त्रक्रिया, थाँयराइड वरील शस्त्रक्रिया, मुतखडा, आपेंडिस्क, कान, नाक, घसा यावरील शस्त्रक्रिया सह अन्य आजारावर त्याना महागड्या शस्त्रक्रिया व औषध उपचार वेळेत आणि मोफत, अल्प दरात मिळाव्यात या उदात्त हेतूने तेरणा पब्लिक चारीटेबल ट्रस्ट उस्मानाबाद संचलित तेरणा जनसेवा क्लिनिकच्या वतीने हा स्तुत्य उपक्रम जिल्हा भर राबविला जात असून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जनतेच्या सोयीच्या द्रष्टीने ठिक ठिकाणी मोफत माहिती व जनसंपर्क केंद्र सुरु करण्यात आले आहे.
त्याचाच भाग म्हणून नळदुर्ग येथे बसस्थानकासमोरील जि.प.प्रशाला (मुलांची) येथे दर शुक्रवारी मोफत आरोग्य तपासणी व उपचार माहीती जनसंपर्क केंद्र सुरू करण्यात आले असून नुतन वर्षाच्या प्रारंभी होऊ घातलेल्या ग्रा.प. निवडणूकीच्या अचार संहीतेचे पालन करत साध्या पध्दतीने दि. १ जानेवारी २०२१ रोजी शुभारंभ करण्यात आले आहे.
यावेळी पं.स. सदस्य सिद्धु कोरे, भाजपाचे सुशांत भुमकर, डॉ. सय्यद परवीन, जनसंपर्क अधिकारी उत्तम शिंदे, आरोग्य कर्मचारी सलिम नाईकवाडी, सुजित पाटील आदीजण उपस्थित होते. पहिल्याच दिवशी सहा रूग्णांनी आपली तपासणी करून घेतली. त्यापैकी दोन रूग्णांना उपचारासाठी पाठविण्यात आले. नळदुर्ग व परिसरातील रूग्णांनी याचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन तेरणा पब्लिक चारीटेबल ट्रस्ट उस्मानाबादच्या वतीने करण्यात आले आहे.