तामलवाडी, दि. २३:
तुळजापुर तालुक्यातील पांगरदरवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमीत्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 26 शिवभक्तांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिरामध्ये महिला रक्तदात्यांनी देखील उत्सफुर्तपणे सहभाग नोंदवला होता.
छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोमवार दि.22 फेबु्रवारी रोजी रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरातील रक्तसंकलन करण्यासाठी उस्मानाबाद येथील शासकिय रूग्णालयातील रक्तपेढीला पाचारण करण्यात आले होते.
या रक्तदान शिबिरास तामलवाडीचे सहाय्यक पोलिस निरिक्षक सचीन पंडित यांनी भेट देऊन आयोजकांचे आभार मानले. यावेळी सरपंच विजय निंबाळकर, पोलिस पाटिल दादासाहेब मारडकर, प्रताप निंबाळकर, सोमनाथ शिंदे यादिंची उपस्थिती होती.
रक्तसंकलन करण्यासाठी रक्तपेढीच्या वतिने डॉ.आश्विनी गोरे, दिनकर सुपेकर, गणेश साळुंके,सुष्मा घोडके, महादेव जाधव यांनी सहभाग नोंदवला.
रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी महेश सावंत, मंगेश कदम, ऋषिकेश टिंगरे, अमिर पठाण, प्रमोद कदम, शंकर गाटे यादिं शिवप्रेमी युवकांनी सहकार्य केले.