!!.. गरज आहे या महाराष्ट्राला शिवसंस्काराची ..!!


                   नमस्कार, हे विश्वची माझे घर असे म्हणणारे संत व छत्रपती शिवाजी राजे माँ साहेब जिजाऊ कुलस्वामिनी आई तुळजाभवानी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रात जन्माला येणे हे केवळ मोठे भाग्य आहे इतर राज्यांची पार्श्वभूमी नैसर्गिक असली तरी महाराष्ट्र राज्य भाग्यशाली आहे. याचं कारण महाराष्ट्र राज्याला एक कर्तव्यदक्ष राजा होऊन त्यांच्या संस्कारक्षम विचारांचे गौरवशाली महाराष्ट्राचा इतिहासाची साक्ष आहे.

                    छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राकडे आज पाहिले असतात आज महाराष्ट्रात सध्या शिवसंस्काराची गरज भासत आहे. कारण आज महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण दुषित झाले आहे. या पवित्र महाराष्ट्राच्या मातीत नाजुक कळी खुडली जात आहे भर रस्त्यात स्त्रीची अब्रु लुटली जात आहे. अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, बलात्कार यांची कीड महाराष्ट्र लागली आहे. एक काळ होता तो महाराष्ट्रातील जनता म्हणायची "ईडा पिडा टळू दे बळीराजाचे राज्य येऊ दे." बळीराजाचे राज्य म्हणजे शिवकालीन स्वराज्य शिवराज्य होय. तेव्हा जर स्त्रीवर अन्याय होत असेल तर शिवकालात न्याय होता. त्या राज्यात आरोपीचे अवयव कलम केले जायचे. पण त्याच महाराष्ट्रात भ्रष्टाचार आणि सुरक्षितता माजली आहे. कारण या महाराष्ट्रातील तरुणाईला व युवा पिढीला आई माँ साहेब जिजाऊ व छत्रपती शिवरायांच्या संस्काराची गरज आहे. "परस्त्री ही मातेसमान मानावी समजावी." याचा आदर्श घालून दिलेल्या शिवरायांच्या संस्कृतीचा अनमोल संस्कार लोप पावत आहेत. म्हणूनच महाराष्ट्रात कोपर्डी, नांदेडमध्ये हिंगणघाट, उस्मानाबाद मधील अणदूर महाराष्ट्राबाहेर हैद्राबादच्या प्रियंका रेड्डी प्रकरणास, अन्याय, अत्याचार, बलात्काराच्या अमानवी कृत्य सातत्याने महाराष्ट्रात उदयास येत आहे.

                           गिनीज बुक ऑफ वर्ड रेकॉर्ड ने आदर्श राजा म्हणून ज्यांची नोंद घेतली आहे. त्याच  राजाच्या राज्यात डान्सबार मोकाट सुरू आहेत. या जगात अनेक राजे होऊन गेले. पण या महाराष्ट्राच्या मातीतील अनमोल रत्न म्हणजे राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज  जगावेगळे ठरले. याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे प्रत्येक राजाच्या  राजदरबारात करमणुकीसाठी स्त्रीला नाचले जायचं पण शिवरायांच्या राज्यात राजदरबारात स्त्रीचा मान सन्मान केला जायचा. या जगाच्या पाठीवर असा एकच राजा हे ज्यांनी आपल्या राजदरबारात स्त्रीला नाचवलं नाही म्हणुन त्या विचारांची व शिव संस्काराची जगभरात चर्चा व आदर्श आहे.

                            अलीकडच्या काळात फॅशन पाश्चिमात्यकरणाने आक्रमण केले आहे. त्यामुळेच माणसाचे वागणे राहणे आणि विचारसरणी तर फार मोठे बदल होत चालला आहे. माणसाने माणसाला व माणुसकीला विसरला आहे नातेसंबंध न टिकवता त्याच विभाजन  होत चालला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पिढी दुषित विचाराने बदलत जात आहे. त्याचा परिणाम युवा, तरुण पिढीवर व हिंदु संस्कृतीवर होत चालला आहे. आज एकविसाव्या शतकात जागतिकीकरण झाले आहे. त्यामुळे पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव पडतोच पण त्यातुन आपल्या फायद्याचे व शिवसंस्कृतीला तडा जाणार नाही या गोष्टीचा विचार करून स्वीकार करावा. मला आज या तमाम महाराष्ट्राच्या जनतेला व जिजाऊ सांगण आहे की आदर्श घेऊनिया जिजाऊ माँ साहेबांचा तुमचा पुत्र घडवावा शिवछत्रपती. आपल्या मुलांना मुलास आदर्श घालून द्यावा शिवसंस्कृतीचा व छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा त्यांच्या मनात व ह्रदयात रुजवा राजा शिवछत्रपती पुन्हा परत तुम्हाला कधीच गरज पडणार नाहीत या महाराष्ट्रात प्रश्न स्त्री सुरक्षिततेचा. हा महाराष्ट्र आपुला आहे. आपल्या महाराष्ट्राला गौरवशाली बनवुया आणि जतन करूया शिवसंस्कृतीच्या विचारांना शेवटी मी एवढंच म्हणेन.हे युवका,

"नको लागु हव्यासा पोटी,
नको लागु तु वासने पाठी,
 आदर्श आहे या महाराष्ट्राचा.
आदर्श घे तु राजा शिवछत्रपती..!"

रवि कदम
चव्हाणवाडी

 
Top