नळदुर्ग ,दि. 5
इंधन दरवाढीवरून नळदुर्ग येथे शिवसैनिकांनी शुक्रवार रोजी सकाळी साडे अकरा वाजता जोरदार निदर्शने करीत केंद्र शासनाचा निषेध व्यक्त केले आहे.
प्रारंभी बसस्थानकासमोर महामार्गावर शिवसेनेचे पदाधिकारी , कार्यकर्ते एकत्र जमले, यावेळी केंद्र सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली . पेट्रोल, डिझेल,गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्याचे जगणे मुशकील झाले आहे. त्याचबरोबर गेल्या कित्येक दिवसापासुन दिल्लीत शेतक-याचे आंदोलन सुरू असुन केंद्र सरकार यांची दखल न घेता शेतकरी विरूध्द धोरण राबत असल्याचे सांगुन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण , बाळकृष्ण घोडके यानी सडकुन टिका केली.
यावेळी शिवसेनेच्यावतीने मंडळ आधिकारी अमर गांधले याना निवेदन देण्यात आले ,याप्रसंगी अमर गांधले, तलाठी टि.डी. कदम, शिवसेना नळदुर्ग शहर प्रमुख संतोष पुदाले, माजी उपजिल्हा प्रमुख कमलाकर चव्हाण , तालुका उपप्रमुख सरदारसिंग ठाकुर , तालुका प्रमुख ग्राहक संरक्षणचे राजेद्र जाधव , शाम कनकधर, नेताजी महाबोले, ओमकार कलशेटटी , सोमनाथ म्हेत्रे, चंदर सगरे, भिमा कोळी, तलाठी टि.डी कदम, पोलिस उपनिरिक्षक एम.एम शहा आदिसह शिवसैनिक उपस्थित होते.