तुळजापूर, दि. ८ :
तुळजापूर तालुक्यातील सरपंच उपसरपंच यांच्या निवडी झाल्या . त्यामध्ये तुळजापूर तालुक्यात खालील ग्रामपंचायतवर शिवसेनेचा सरपंच-उपसरपंच यांच्या रूपामध्ये भगवा फडकला.
येवती येथील सौ पूजाताई अमोल गवळी हे शिवसेनेचे सरपंच तसेच आरळी खुर्द येथील सरपंच सौ पल्लवीताई सतीश गायकवाड व उपसरपंच विठ्ठल मोहिते यांची निवड झाली.
कुंभारी येथील सरपंच सौ संगीताताई नाना कोळी व तसेच बिजनवाडी येथील शिवसेनेचे सरपंच दत्तात्रेय काळदाते, जळकोट येथे उपसरपंच सौ श्रीदेवी बसवराज कवठे तसेच भातंब्री सरपंच कृष्णात हरदास लोंढे व उपसरपंच रवी मारुती बंडगर तसेच गंधोरा येथील ग्रामपंचायत उपसरपंच संजय चंनबस भोसले, शहापूर येथील उपसरपंच प्रदीप पांडुरंग काळे यांची निवड झाली. त्यावेळेस त्यांचा सत्कार माजी शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्याम पवार, शहर प्रमुख सुधीर कदम, तालुका प्रमुख जगन्नाथ गवळी , उपशहरप्रमुख बाळासाहेब शिंदे ,उपतालुका प्रमुख सुनील जाधव ,जयकुमार दरेकर ,दत्ता तांबे, विजय पवार, अमोल गवळी, प्रताप तांबे' कुष्णाथ मोरे यांच्या उपस्थितीमध्ये यांचा सत्कार करण्यात आला.