तुळजापुर, दि. १५ :
तुळजापूर तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी आपण निश्चितपणे मदत करू असे आश्वासन तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी नवनिर्वाचित सरपंच यांच्या सत्कार प्रसंगी दिले.
तुळजापूर तालुक्यातील भातंब्री, वानेगाव व खडकी या गावातील नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचे सत्कार करुन अभिनंदन करण्यात आले.
या नव्या भूमिकेच्या माध्यमातून गावाच्या सर्वांगीण विकासात आपण मोलाचे योगदान द्याल हा विश्वास आहे.
यामध्ये भातंब्रीचे पॅनल प्रमुख रवी पाटील, सरपंच कृष्णानाथ लोंढे, उपसरपंच रवी बंडगर, श्रीमती सुनंदा बंडगर, गुणवंत बंडगर, श्रीमती सीतादेवी सलगर, श्रीमती सुरेखा लोंढे, श्रीमती निलावती कांबळे, वानेगावचे सरपंच शामराव चव्हाण, उपसरपंच आप्पासाहेब पाटील, नितीन देवकर, नेताजी देवकर, राम चव्हाण, खडकीचे पॅनल प्रमुख राम धोंडीराम जवान, सरपंच श्रीमती सलिमा लतीफ सय्यद, उपसरपंच राहुल राठोड, सदस्य बबन भंडारे, उत्तम सुरवसे, मुरलीधर भंडारे, सिध्दाराम सुरवसे, यशवंत जवान यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी राजाभाऊ सोनटक्के, बाबा श्रीनामे आदींची उपस्थिती होती.
आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा परिचय करून घेतला आणि त्यांच्या बरोबर गावपातळीवरील विकासाच्या कामासंदर्भात चर्चा केली.