काटी,दि.२१:उमाजी गायकवाड
सोलापुर -  धुळे राष्ट्रीय महामार्ग क्र. ५२ वर गेले ३ वर्षापासुन   लोखंडी शिडी उभारणीच्या मागणीला न्याय मिळाला असुन शिडी उभारणी कामाच्या  मंजुरीनंतर   वर्षभरापासुन रेंगाळलेल्या लोखंडी शिडी उभारणीसाठी लागणारे  साहित्य, सामग्री , सांगवी ( काटी ) झोपडपट्टी भागात  दाखल झाले आहे.

 त्यामुळे झोपडपट्टीमधील नागरीकांचा धोकादायक रस्ता ओलांडण्याची समस्या  संपणार आहे.  महिनाभरात शिडी उभारणीचे काम पुर्ण करण्याच्या तयारीला वेग आला आहे .
सोलापुर धुळे राष्ट्रीय महामार्गाच्या रूंदिककरणानंतर  सांगवी झोपडपट्टी भागात  येथे भुयारी अथवा पर्यायी मार्ग तयार करावा यासाठी  गावकऱ्यानी, रास्ता रोको आंदोलन केले.  मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने गावकऱ्याच्या मागणीला हरताळ फासला. दोन वर्षापासुन टोलवसुली सुरू झाली.  तिन वर्षानंतर शिडी उभारणीच्या कामास मंजुरी मिळाल्याने  गावकऱ्याना न्याय मिळला.

 एक वर्षापुर्वी शिडी उभारणीसाठी खड्डे खोदुन सिमेंटचे चबुतरे उभारली.  मात्र कामाचा श्रीगणेशा केला नाही.   झोपडपट्टी भागातील नागरीकाना रस्ता ओलांडण्यसाठी भरधाव वेगाने जाणारी वाहने चुकवुन जीव मुठीत धरून  जावे लागत असल्याची बाब  प्रशासनासमोर उघड केले. १५ दिवसात लोखंडी शिडी उभारणीसाठी लागणारी लोखंडी सामग्री सांगवी झोपडपट्टी भागात दाखल झाली आहे. त्यामुळे धोकादायरित्या महामार्ग ओलांडताना नागरीकाची होणारी गैरसोय दुर होणार आहे.

 येत्या महीनाभरात शिडी उभारणीचे काम पुर्ण करण्याच्या दृष्टीने कामाला गती आली आहे. त्यामुळे गावकऱ्यात समाधान व्यक्त होत आहे .


 गावकऱ्यानी बाजु मांडली 

भुयारी मार्गासाठी झालेले रस्ता रोको  आंदोलनानंतर तीन वर्षांनी गावकऱ्याना न्याय मिळाला पुर्व बाजुस असणारी शाळा, बॅक , येथे जाणाऱ्या विद्यार्थी , ग्राहकाची सोय झाली 
ललिता मगर 
सरपंच 
सागवी ( काटी ) 


शिडीवर दिवाबत्तीची सोय करा 

झोपडपट्टी भागात  लोखंडी शिडी उभारणीचे काम पुर्ण करताना तिथे रात्री पायी जाणाऱ्या पादचाऱ्यासाठी ठेकेदाराने दिवाबत्तीची सोय करावी, जेणेकरून रात्रीच्या  वेळी अंधारात दुर्घटना होणार नाही, ३ वर्षानंतर झोपडपट्टीवाशी याच्या मागणीला न्याय मिळाला आहे 
रामदास मारूती मगर 
रहीवाशी
सांगवी झोपडपट्टी
 
विद्यार्थ्यची गैरसोय दुर होणार 

सांगवी झोपडपट्टी भागातील २६ विद्यार्थी महामार्ग ओलांडुन पुर्वे बाजुस शाळेत येत महामार्गावर शिडी उभारणी मुळे विद्यार्थी सुरक्षितरित्या शाळेत येण्यास अडचण राहणारी नाही विद्यार्थी व शेतकऱ्याना भासणारी समस्य  सातत्याने मांडल्याने  प्रश्न मार्गी लागला.
 
काशीनाथ सुरवसे 
मुख्याध्यापक  
झोपडपट्टी जि. प .शाळा
 
Top