तुळजापूर,दि.१२
येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात  यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी बालाघाट शिक्षण संस्थेचे सचिव उल्हास  बोरगावकर  यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या  प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ.मोहन बाबरे, उपप्राचार्य डॉ. नरसिंग जाधव,सिनेट सदस्य प्रा संभाजी भोसले, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. शिवाजी जेटीथोर, प्रा.जी. व्ही. पाटील ,प्रा. डॉ. प्रवीण भाले,प्रा. डॉ. एस. एस. कदम, प्रा.डॉ. मंदार गायकवाड, प्रा.अमोद जोशी ,प्रो. डॉ.अशोक मरडे,प्रा. डॉ. कार्तिक पौळ, प्रा. अमर बोरगावकर,  पांडुरंग नागणे, प्रकाश कुंभार यांची उपस्थिती होती. 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. शिवाजी जेटीथोर यांनी तर आभार प्रा. डॉ. प्रवीण भाले यांनी मानले.
यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,विध्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या
 
Top