वागदरी ,दि.१० : एस.के.गायकवाड
राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक-१० सोलापूर येथे शासकीयआरोग्य सेवेत कार्यरत असलेले सुभाष बनसोडे यांना नुकतेच कोरोना योध्दा पुरस्कारने सन्मानित करण्यात आले.
सुभाष बनसोडे हे मुळचे तुळजापूर व अक्कलकोट तालुक्याच्या सिमारेषावर वसलेल्या तुळजापूर तालुक्यातील बोळेगाव येथील रहिवासी असून सध्या ते महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागात राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक १० सोलापूर येथे शासकीय दवाखान्यात सेवेत कार्यरत आहेत.
कोरोना महामारीच्या काळात त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन आरोग्य सेवा राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या वतीने राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक १० सोलापूरच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.मिनाक्षी बनसोडे यांच्या हस्ते तर जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मोहन शेगर यांच्या प्रमुख उपस्थिती त्याना प्रशस्तीपत्र व स्मृती चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.