काटी,दि.२४
 कोरोना व्हायरस काय आहे? या व्हायरसचा प्रसार कसा होतो? या आजारास प्रतिबंध करण्यासाठी काय उपाय योजना आवश्यक आहेत? या बाबत माहिती देत  तुळजापुर तालुक्यातील चव्हाणवाडी येथे ग्रामस्तरीय कोरोना प्रतिबंधक दक्षता समिती अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक, आशा कार्यकर्ती आणि अंगणवाडी सेविका यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना विषाणू बाबत  गावात जनजागृती मोहीम राबविण्यात आली. 

या मोहिमेत कोरोना विषाणू ने जगभरात थैमान घातले असल्याचे सांगून या महामारीत स्वतःची काळजी स्वतः घेऊन नागरिकांनी नियमित सॅनिटायझर, मास्कचा वापर करावा, वारंवार साबनाने हात स्वच्छ धुवावेत आणि सामाजिक अंतर ठेवण्याचे आवाहन करुन   करोना व्हायरस काय आहे? या व्हायरसचा प्रसार कसा होतो? आजारास प्रतिबंध करण्यासाठी काय उपाययोजना आवश्यक आहेत?  या आजाराचे स्वरुप काय आहे? या कोरोना  संसर्गजन्य आजाराबाबत नागरीकानी  कोणती दक्षता घ्यावी याबाबत नियमावली सांगून कोरोना विषाणू बाबत गावात जनजागृती मोहीम राबविण्यात आली. 

    या मोहिमेत ग्रामसेवक सदानंद इंगळे, सहशिक्षक एस.डी. जेटीथोर, बी.एस.भोयटे, ए.एस. जेटीथोर, श्रीमती सुषमा देशमुख, श्रीमती पाटील गीताश्री आशाकार्यकर्ती गोकुळेताई,  अंगणवाडी सेविका श्रीमती नयना खलाटे,सरपंच श्रीमती अनिता गोकुळे,उपसरपंच तुकाराम चव्हाण, पोलीस पाटील शञुघ्न चव्हाण आदीजण उपस्थित होते.
 
Top