तुळजापूर, दि. १७  :
जिक्रा जुनेदी या 7 वर्षाच्या चिमुरडीने  रमजान महिन्यातील पवित्र असा  पहिला रोजा अर्थात उपवास पुर्ण केला.


मुस्लीम धर्मियांचा पवित्र रमजान महिना दि. 14 एप्रिल पासून सुरू झाला आहे. या पवित्र रमजान रोजा अर्थात उपवासास धार्मिक महत्व असून मुस्लीम बांधवाकडून रोजाची कडक धारणा केली जाते. पहाटे सहेरी केल्यानंतर दिवसभर कांहीही न खाता व पाण्याचा एक थेंबही न पिता अल्लाहची आठवण करून रोजा पुर्ण केला जातो. या पवित्र रमजानच्या महिन्यात  30 दिवस अनेक जण अगदी धार्मिकतेने रोजा करतात. 

मुस्लीम धर्मामध्ये पाच तत्वापैकी रोजाला विशेष महत्व दिले जाते. 

उस्मानाबाद शहरातील मिल्ली कॉलनी येथील  जिक्रा समद जुनेदी  या चिमुरडीने  रमजान महिन्यातील  पहिला रोजा अर्थात उपवास गुरुवारी पुर्ण केला. सध्या कडक उन्हाळा आहे, अशा कडक उन्हाळ्यात देखील लहान वयातच जिक्रा हिने रोजा धरून तो पुर्ण केल्याने जुनैदी परिवाराने तसेच सर्व नातेवाईकांनी तिला पुष्पहार घालून शुभेच्छा देवून तिचे कौतुक केले. जिक्रा जुनैदी ही भूम येथे कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रब्बानी आरेफ जुनैदी यांची पुतणी आहे.
 
Top