अणदुर,दि.९ :
तुळजापूर तालुक्यातील अणदुर येथे शिक्षक खंडेराव कांबळे यांनी पिता धोंडीबा मल्हारी कांबळे यांच्या पुण्य दिनानिमित्त होणारा खर्च टाळून फक्त प्रतिमा पूजन केले.
युवकांना दिशादर्शक असणाऱ्या 20 पुस्तकांचा संच तसेच वर्षभर वाचनालयास एक वृत्तपत्र व उद्योजक मासिकाची भेट संस्थेचे अध्यक्ष उमाकांत करपे सचिव साहेबराव घुगे यांच्याकडे सुपूर्द केली.
वाचनालय हे सामाजिक मनाचे खाद्य आहे. माणसाचे मन समृद्ध व संतुलित राहण्यासाठी ग्रंथालयाचे कार्य महत्त्वाचे ठरते.म्हणुन सर्व गोष्टीला बाजुला ठेवुन हा निर्णय केल्याचे कांबळे यांनी सांगितले ,
यापूर्वी अनेकदा समाजाच्या विविध स्तरातून वस्तू ,ग्रंथ स्वरुपात केशव वाचनालयास मदत प्राप्त होत असते आजच्या या मदतीबद्दल यावेळी शिक्षक खंडेराव कांबळे यांचे आभार मानले .