कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात रविवार  दि. 30 मे  रोजी 219 पॉजिटीव्ह;  तर 8 जणांचा मृत्यू


उस्मानाबाद, दि. 30   :  उस्मानाबाद जिल्हयात आज रविवार   दि. 30  मे रोजी  प्राप्त झालेल्या अहवालानुसार 219 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर 8 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात 577 जण बरे होवून घरी परतले आहेत. 
जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 54 हजार 656  इतकी झाली आहे. यातील 50 हजार 217 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 1 हजार 233 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 3 हजार 206 जणांवर उपचार सुरु आहेत.
बरे होण्याचे प्रमाण 91.87 टक्के , मृत्यू दर 2.25 टक्के .

 
Top