उस्मानाबाद, दि. 02 : उस्मानाबाद जिल्हयात आज रविवार दि. 02 मे रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 486 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर 9 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात 715 जण बरे होवून घरी परतले आहेत.
जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 39 हजार 501 इतकी झाली आहे. यातील 31 हजार 670 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 950 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 6 हजार 881 जणांवर उपचार सुरु आहेत.