नळदुर्ग, दि. 27  
 मागील भांडणाच्या कारणावरुन दि. 25 मे रोजी 11 वाजण्याच्या वाजण्याच्या सुमारास  चिवरी पाटी शिवारात अणदुर, ता. तुळजापूर येथील शिवाजी बनसोडे, जगन्नाथ कुंभार, अनिल कुंभार, नागेश गडदे अशा चौघांनी संगणमताने गावकरी विश्वनाथ निवृत्ती गळाकाटे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गज, वायरने मारहाण करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या विश्वनाथ गळाकाटे यांनी दि. 26 मे रोजी दिलेल्या प्रथम खबेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. 



 दुसऱ्या घटनेत सुभाष तुकाराम काळे, रा. अणदुर यांसह त्यांची पत्नी- श्रीदेवी, भाऊ- गोरख यांसह दि. 24 मे रोजी 12.00 वाजण्याच्या सुमारास अणदुर येथील आपल्या शेतात होते. यावेळी गावकरी निळकंठ करपे, युवराज करपे, योगेश तोगी, युवराज करपे, सुरज अशा पाच जणांनी, “आम्ही मशागतीसाठी पाठवलेले ट्रॅक्टर तुम्ही परत का पाठवले.” असे नमूद काळे कुटूंबीयांस धमकावून शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच गोरख व सुभाष या दोघा भावांस काठीने व कुऱ्हाडीच्या तुंब्याने मारहाण करुन सुभाष यांच्या अपंगत्वास हिनवले. अशा मजकुराच्या सुभाष काळे यांनी दि. 26 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 सह अपंग अधिकार कायदा कलम- 92 (ब) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
 
Top