घोळसगाव , दि.१४ :
थोर समाज क्रांतिकारक, समता नायक, क्रांतीसुर्य महात्मा बसवेश्वर यांची जयंती घोळसगाव ता. अक्कलकोट येथे अत्यंत साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली.
बसवश्री प्रतिष्ठान व महात्मा बसवेश्वर समाजकल्याण संस्था घोळसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने लिंगायत धर्म संस्थापक महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाची सुरुवात महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस शरण मांतेश आलूरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.
यावेळी शरण सतीश पालापुरे महात्मा बसेश्वर यांच्या 12 व्या शतकातील समतेची भावना व त्यांच्या कार्याची ओळख करून दिली. शरण अमोल गोगावे यांनी लिंगायत व वीरशैव हा वाद बाजूला सारून समाजासाठी एकत्र यावे असे मत व्यक्त केले. शरण विकास किवडे यांनी समाजातील तरुण पिढी एकत्र येऊन व शरणांचा विचार व आचार आत्मसात करावा असे मत व्यक्त केले.
शरण धर्मेंद्र गायकवाड यांनी महात्मा बसेश्वर यांच्या विचाराप्रमाणे अनेक लोकोपयोगी कार्य करावे असे मत व्यक्त केले. त्यानंतर शरण राजेंद्र पाटील यांनी लिंगायत धर्म हा कसा निर्माण झाला व कशा पद्धतीने वचन साहित्य निर्माण झाले. अनुभव मंडपाची निर्मिती व त्यातील शरण शरणी यांचे कार्य याबाबत माहिती देऊन बसवेश्वरांचे वचन व विचार आत्मसात करावे असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालन व आभार प्रदर्शन शरण रेवणसिद्ध उमाटे यांनी केले. या कार्यक्रमास गावातील सर्व गावकरी माजी माजी सदस्य उपस्थित होते. कोरोना च्या काळातील सर्व नियमांचे काटेकोर पालन करून छोट्या पद्धतीने कार्यक्रम व्यवस्थित पार पडला.