नळदुर्ग ,दि.३१ : बारामती अग्रीकल्चरल ट्रस्टच्या विश्वस्त तथा आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री, सौ सुनंदा राजेंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नळदुर्ग येथील कोविड सेंटर येथे रोहित पवार विचार मंचच्या वतीने कोविड रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी रोहित पवार विचारमंचचे प्रदेश कार्याध्यक्ष ॲड अमोल पाटील , तुळजापूर तालुका अध्यक्ष, श्रीधर नरवडे, प्रमोद बिराजदार, गुरव समाज संघटनेचे प्रदेश सरचिटणीस महेश बिराजदार,शंकरसिंग चव्हाण, लक्ष्मण बिराजदार आकाश बिराजदार, उपस्थित होते.