तुळजापूर दि १६ :
काँग्रेस राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांच्या निधनाने महाराष्ट्राचे खूप मोठे नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून काढणे कठीण आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे तुळजापूर तालुका अध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.
वसंतराव गोपीनाथराव पाटील प्रशाला नांदुरी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात काँग्रेसचे नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर त्यांना आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी प्रतिमा पूजन केले. याप्रसंगी सोशल डिस्टन्स आणि कोरोना नियमांचे पालन करीत श्रद्धांजली वाहण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करताना खासदार राजीव सातव यांनी पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच पक्षाच्या विविध निवडणुकांमध्ये प्रभारी म्हणून कामकाज केले. त्यांच्या दिल्लीतील राजकारणामध्ये महाराष्ट्राला खूप मोठा आधार होता.
राज्याचा हा आधार आज राजीव सातव यांच्या निधनाने कोसळला आहे, अशा शब्दात धैर्यशील पाटील यांनी नांदुरी येथे श्रद्धांजली वाहिली.