लोहारा,दि.३०
पोलीस ठाणे, लोहारा: दशरथ नागनाथ शिरगीरे, रा. कानेगांव, ता. लोहारा या दि. 24- 28.05.2021 रोजी दरम्यान बाहेर गावी गेले होते. दरम्यानच्या काळात त्यांच्या घराचा कडी- कोयंडा अज्ञात व्यक्तीने तोडून घरातील कपाटातील 20 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 45,000 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या दशरथ शिरगीरे यांनी दि. 29 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 454, 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.