नळदुर्ग,दि.१७: 
येथिल जावाई तथा भाजपचे कट्टर कार्यकर्ते  सोलापूरचे माजी नगरसेवक दत्तात्रय  सखाराम उर्फ  बंडु कुलकर्णी यांचे नुकतेच  निधन झाले. ते नळदुर्ग येथिल नगरसेवक विनायक अंहकारी 
व श्रीनिवास अहंकारी  यांचे भाऊजी होत.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा,एक मुलगी असा परिवार आहे.

 ते  कोविडने आजारी होते .त्यातुन ते बरे झाले  म्हणुन  त्याना सामान्य वार्ड येथे हलवले होते.  गेली 3/4 दिवस त्यांच्या प्रकृतीत चढ उतार सुरु होते.  अखेर त्यांचा शनिवारी मृत्यु झाला.


 भाजपाचा प्रामाणिक  व कष्टाळू   कार्यकर्ता  म्हणुन त्यांची ओळख होती. विधानसभा व लोकसभा निवडणुकीत  प्रचाराचा भाग म्हणून  त्यांच्या प्रभागातील प्रत्येक  मतदारा पर्यंत   पोहचणारा  नगरसेवक अशी पण त्यांची कार्यपध्दती होती . 

 ते सोलापूर  महानगरपालिकेत  विरोधी पक्ष नेता म्हणुन काम पाहिले. त्यांची ती पण कारकिर्द  सोलापुरकरांच्या लक्षात राहील अशी होती. 


ते भारतीय  मजदुर संघाचे पण कार्यकर्ते  होते.  सोलापूरात रिक्षा संघटना उभी करण्यात त्यांचा वाटा होता.
            
 
Top