नळदुर्ग ,दि.३१ , 
माझे गाव कोरोनामुक्त गाव अभियानांतर्गत  कुन्सावळी ता. तुळजापूर  येथे ग्रामपंचायतद्वारा आरोग्य विभागाच्या कर्मचा-यानी आतापर्यत   ७१ ग्रामस्थांची  आर.टी.पी.सी.आर.टेस्ट करण्यात आली आहे. गावातील नागरिकांना यापुर्वीच मास्कचे वाटप करण्यात आले असून गाव परिसरात तिसऱ्यांदा निर्जंतुकीकरण  फवारणी देखील करण्यात आलेली आहे.तसेच लसीकरणाबाबत जागृती केली जात असून त्यास ग्रामस्थांनी उत्सर्फुत  प्रतिसाद दिले.गावातील नियुक्त कर्मचाऱ्यांकडून  सर्वेक्षणाचे काम चालू असून सदर नियोजन सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत टीम व स्थानिक शासकीय कर्मचारी यांच्या उपस्थितीत चालू आहे.

यावेळी कोरोनाविषयक सर्व नियमांचे पालन केले जात असून नागरिकांना पूर्णपणे काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.
 
Top