उस्मानाबाद, दि. 16 : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रासह देशभरात खळबळ उडवली आहे. कोरोनाग्रस्त मृतांची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली असून म्युकरमायकोसिस’ या बुरशीजन्य आजाराने उस्मानाबाद जिल्ह्यातील एका रुग्णांचा सोलापूर येथे खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. या घटनेने जिल्हाभरात खळबळ माजली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,  पळसप ता. उस्मानाबाद येथील  अर्जुन उत्तरेश्वर लाकाळ यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर उपचार सुरू होते. कोरोनातून बरे होत असतानाच त्यांच्या डोळ्याला म्युकरमायकोसिसची लागण झाली. सोलापूर येथे उपचार सुरू असताना ऑपरेशन करून एक निकामी झालेला डोळा काढावा लागला. त्यातच त्यांची प्रकृती खालावली व त्यांचा उपचार दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला , उस्मानाबाद जिल्ह्यातील रुग्णांचा हा पहिला म्युकरमायकोसिसचा बळी असून आणखी एक रुग्णही दगवल्याची माहिती हाती येत आहे.

 
Top