तुळजापूर: कोविड- 19 च्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद यांनी विविध मनाई आदेश जारी केले आहेत. असे असतांनाही ते मनाई आदेश झुगारुन दादासाहेब नावडे यांनी दि. 22 मे रोजी 19.00 वा. सु. गावातील आपले किराणा दुकान व्यवसासायास चालू ठेउन कोविड- 19 संसर्गाची शक्यता निर्माण होण्याची निष्काळजीपणाची कृती केली. यावरुन तुळजापूर पो.ठा. चे पोकॉ- अजितकुमार सोनवणे यांनी सरकातर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188, 269, 270 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.