उस्मानाबाद ,दि.७
हुजैफा अस्लम शेख, रा. मिली कॉलनी, उस्मानाबाद यांनी दि. 06 मे रोजी 10.40 वा. सु. शहरातील ताजमहाल चित्रमंदीराजवळील आपल्या ‘हिंदुस्थान बेकरी’ च्या टेबलवर ठेवलेली 1,12,530 ₹ रोख रक्कम असलेली पिशवी व स्मार्टफोन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या हुजैफा शेख यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.