उस्मानाबाद, दि. 04 : उस्मानाबाद जिल्हयात आज शुक्रवार दि. 4 जून रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 160 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर 2 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात 405 जण बरे होवून घरी परतले आहेत.
जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 55 हजार 715 इतकी झाली आहे. यातील 52 हजार 406 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 1 हजार 268 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 2 हजार 41 जणांवर उपचार सुरु आहेत.