लोहारा ,दि. २२ :
लोहारा कृषी कार्यालय अंतर्गत शेतकऱ्यांसाठी विविध योजनेबाबत जनजागृती व लोहारा तालुका कृषी कार्यालय हे अत्यंत महत्त्वाचे कार्यालय असल्याने येथील कृषी अधिकारी यांना मुख्यालयात राहणे बंधनकारक करण्याचे निवेदन लोहारा तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना लोहारा तालुका संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आले आहे.
सदर संभाजी ब्रिगेडच्या वतीने दिलेल्या निवेदनामध्ये तालुक्यातील शेतकरी बांधवांवर अनेक वेळा कधी अतिवृष्टीमध्ये तर कधी दुबार पेरणी मध्ये शेतकरी बांधवांवर अनेक संकट ओढावले आहेत. गेल्या चार पाच वर्षापासून शेतकरी हतबल झाला आहे. अशा संकटकाळात कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांबाबत कुठलीही जनजागृती न करता नुसते फोटो सेशनसाठी गावागावांमध्ये शेतकऱ्या बाबत कार्यक्रम घेतले जातात तसेच पेरणी पूर्व प्रशिक्षण शेतकर्यांना कृषी विभागाअंतर्गत दिले जात आहे. परंतु आजही अनेक गावातील शेतकरी अनभिज्ञ आहेत.
यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून प्रत्येक गावातील नेमून दिलेल्या कृषी सहाय्यकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी जनजागृतीपर कार्यक्रम घेणे गरजेचे आहे.
तसेच अनेक गावात कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांबाबत शिबिर अंतर्गत शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्यासाठी प्रवृत्त करावे, सध्या पेरणीचे दिवस असल्याने कृषी दुकानदाराकडून बी बियाणे तुटवडा होत आहे. याबाबत कृषी विभागाकडून कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. यासाठी जनजागृती होणे काळाची गरज आ.हे तसेच कृषी कार्यालयात कृषी अधिकारी कायमस्वरूपी मुख्यालयात राहणे गरजेचे असताना इतर गावाहून ये जा करतात ,यामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. यासाठी तात्काळ कृषी अधिकारी यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक करावे अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने लोकशाही पद्धतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देवुन संबंधित वरिष्ठांनी गांभीर्याने विचार करावा असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष शरद पवार ,लोहारा तालुकाध्यक्ष धनराज बिराजदार ,उपाध्यक्ष किरण सोनकांबळे , सचिव बालाजी यादव, कोषाध्यक्ष अविनाश मुळे' संघटक प्रणित सूर्यवंशी' पवन चौधरी, महादेव मगर आदींच्या या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.