उस्मानाबाद,दि.१६ :  

पोलीस ठाणे, कळंब: सोमनाथ ज्ञानोबा ठाणांबीर, वय 65 वर्षे, रा. कळंब हे दि. 13 जून रोजी 16.00 वा. कळंब येथील येरमाळा रस्त्याने पायी जात होते. यावेळी एका अनोळखी व्यक्तीने तेथे जाउन, “मी पोलीस असुन कळंब मध्ये मोठ्या प्रमाणात तस्करी झाली आहे. त्यांच्या मधील आरोपीसारखे तुम्ही दिसत आहात. तुम्ही बोटांमध्ये इतक्या अंगठ्या कशाला घातल्या.” असे बतावणी करुन सोमनाथ ठाणांबीर यांना बोलण्यात गुंतवले. तसेच ठाणांबीर यांच्या हातातील 17 ग्रॅम वजनाच्या तीन सोन्याच्या अंगठ्या काढायला लावून त्या स्वत:कडे घेउन तो पसार झाला. अशा मजकुराच्या सोमनाथ ठाणांबीर यांनी दि. 15 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 170, 420 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
Top