जळकोट, दि. ५ : मेघराज किलजे तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी येथील ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या पाटील तांडा येथे जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला . सेवाभवन व अंगणवाडी परिसरात विविध प्रकारची ११ फळझाडे पंचायत समिती सभापती सौ. रेणुका इंगोले व सरपंच शरद नरवडे यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आले .
प्रारंभी रेणुका इंगोले यांचा ग्रामस्थांच्यावतीने कोरोनाचे नियम पाळीत यथोचित सत्कार करण्यात आला .याप्रसंगी लोहगाव येथील उपसरपंच भिवाजी इंगोले , ग्रामपंचायत सदस्य सावंत पवार , पाणी पुरवठा समिती अध्यक्ष हरी पवार , गोर आर्मी संघटनेचे प्रवीण पवार , सुधीर राठोड , विलास पवार , अनिल पवार , अमोल राठोड , राम राठोड , गुरुनाथ राठोड , शानाबाई पवार , भालचंद्र राठोड , अंगणवाडी सेविका कल्पना राठोड ,ग्रामस्थ उपस्थित होते .