उस्मानाबाद ,दि.१८ : 
शहरातील खाजा नगर स्थित शम्सुल उलुम उर्दु माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालयातुन महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रज्ञा शोध परिक्षेमध्ये या शाळेतील तीन विदयार्थ्यांनीने यश संपादन केले आहे.

पठाण तहुरा आजम खान, कादरी जव्हेरिया मसिहुल इस्लाम, शेख फातेमा अशफाक  या यशस्वी विदयार्थीनींचे संस्था अध्यक्ष  शेख लईख अहमद, सचिव शेख लईख सरकार व मुजीब साहेब, डॉ. तब्बस्सुम सुलताना तसेच मुख्याध्यापिका काजी रेशमा परविन, शेख गौसिया, दिलशाद  व इतर सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक यानी अभिनंदन केले आहे.
 
Top