उस्मानाबाद,दि .२३:
पोलीस ठाणे, उमरगा: सुरेश सिध्दनाथ पाटील, रा. कसगी, ता. उमरगा यांनी दि. 21 जून रोजी गावातील ग्रामपंचायतीच्या पत्रा शेडमध्ये आपले बैल बांधले होते. रात्री 23.00 वा. सु. सुरेश पाटील त्या बैलांना चारा टाकण्यासाठी शेड मध्ये गेले असता शिवपुत्रा तुकाराम म्हैत्रे, रा. नागलेगांव, ता. आळंद, राज्य- कर्नाटक हे बैलाचे दोवे सोडून बैल चोरुन घेउन जात असतांना मिळुन आला. अशा मजकुराच्या सुरेश पाटील यांनी दि. 22 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379, 511 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, ढोकी: तानाजी विश्वनाथ धाबेकर, रा. दुधगाव, ता. उस्मानाबाद यांनी आपली हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एपी 9788 ही दि. 21 जून रोजी 13.30 वा. सु. दुधगाव शिवारातील लातुर- बार्शी रस्त्यालगत लावून आपल्या शेतात गेले असता दरम्यान त्यांनी नमूद मो.सा. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या तानाजी धाबेकर यांनी दि. 22 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, वाशी: श्रीकांत विश्वंभर गपाट व त्यांचे भाडेकरु- महेश सोनटक्के या दोघांच्या घराचा कडी- कोयंडा अज्ञात व्यक्तीने दि. 19- 22.06.2021 रोजी दरम्यान तोडून गपाट यांच्या घरातील- 34 ग्रॅम सुवर्ण दागिने, 100 ग्रॅम चांदीचे दागिने- वस्तू, 12,000 ₹ रोख रक्कम व कागदपत्रे आणि सोनटक्के यांच्या घरातील- 9 ग्रॅम सुवर्ण दागिने, 35,000 ₹ रोख चोरुन नेली. अशा मजकुराच्या श्रीकांत गपाट यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, मुरुम: बंडाप्पा सिद्राम लोणी, रा. मुरुम, ता. उमरगा यांच्या मुरुम शिवारातील बेरडवाडी रस्त्यालगतच्या शेतातील प्रिन्स कंपनीचा 5 अश्वशक्ती क्षमतेचा विद्युत पंप अज्ञात व्यक्तीने दि. 21- 22 जून दरम्यानच्या रात्री चोरुन नेला. अशा मजकुराच्या बंडाप्पा लोणी यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.